लाडशाखिय वाणी समाजाचे व्यापारातील योगदान कौतुकास्पद – मुख्यमंत्री

0
28
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | लाडशाखीय वाणी समाजाचे व्यापारातील व अर्थव्यवस्थेच्या बळकटी साठीचे योगदान कौतुकास्पद आहे, असे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल पार पडलेल्या अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

यावेळी वाणी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री निधि साठी 11 लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री यांनी वाणी समाजाच्या होतकरु मूलमुलींच्या वसतिगृहासाठी नासिक व पुणे येथे जागा उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले. त्याचप्रमाने समाजाने घेतलेल्या 25 दुष्काळी गावांबाबतच्या निर्णयाचे कौतुक देखील केले.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, कैलास वाणी, गोपाळ केले व जगदीश चिंचोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here