हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन असतानाही लोक बाहेर पडत आहेत. बंदचे नियम पळतांना दिसत नाही आहेत. वारंवार घराबाहेर पडू नका असं आवाहन करून सुद्धा लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. शेवटी लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पोलीस आता पोलीस वेगळ्यावेगळ्या शक्कली शोधून काढत आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये लॉकडाऊन किंवा बंडाचे नियम न पाळणाऱ्या अनोखी शिक्षा देत आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांना सोशल डिस्टन्स म्हणजे ठराविक अंतर राखत आखलेल्या वर्तुळामध्ये बसण्याची शिक्षा देण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या रस्त्यांवर बाहेर पडणाऱ्या अशा महाभागांना पोलीस एका वर्तुळात बसवून लॉकडाऊनचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयन्त करत आहेत.
Jammu and Kashmir: People who were flouting restrictions that have been imposed amid lockdown, made to sit in circles drawn to maintain social distance, in Jammu. #COVID19 pic.twitter.com/4MQMh5LXgV
— ANI (@ANI) March 25, 2020
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.