वंचितचा विरोधी पक्षनेता नाही, मुख्यमंत्री असेल – प्रकाश आंबडेकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता नाही तर मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबाबत भाष्य केलं आहे. वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत आपली व्यूहरचना जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही दिलेली १४४ जागांची ऑफर घेऊन चर्चेसाठीची दारं खुली ठेवली आहेत असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच आमची लढाई वंचितसोबत आहे, काँग्रेससोबत नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्ष नेता वंचित बहुजन आघाडीचा असेल असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले त्याला प्रकाश आंबेडकरांनी आज उत्तर दिले.

“विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्री होईल. काँग्रेसला आम्ही १४४ जागांची ऑफर दिली आहे. त्यावर काही उत्तर येतं का ते पाहणार आणि मग आमची रणनीती जाहीर करणार. ८ सप्टेंबरा नागपूरच्या संविधान चौकातून रॅली निघेल. प्रत्येक दिवशी २ ते ३ जिल्ह्यात जाऊ आणि १८ तारखेला रॅलीचा समारोप कोल्हापुरात होईल ” असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे त्याचसाठी ही रॅली काढत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment