बारामती | ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज निरास्नान घेऊन लोणंद गाठले आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामती मुक्कामी आहे. माऊलींच्या पालखीने दुपारी नीरा-शिवतक्रार गावात नीरा स्नान घेतले. इंद्रायणी स्नाना नंतर नीरा नदीतील स्नान पवित्र स्नान मानले जाते. इंद्रायणी, नीरा,चंद्रभागा हे तिहेरी स्नान वारकऱ्यांसाठी पवित्र स्नान आहे. आज माऊलींची पालखी पुणे जिल्हा सोडून सातारा जिल्ह्यात दाखल झाली आहे. आजच्या रात्री पालखी लोणंद मुक्कामी असून उद्या तरटगाव येथे पहिले उभे रिंगण पार पडणार आहे.
दरम्यान तुकोबांची पालखी शरद पवारांच्या बारामती मध्ये दाखल झाली आहे. तुकोबांच्या पालखीचे काल बारामती तालुक्याच्या सीमेत प्रवेश करते वेळी जी.प.सदस्य रोहित पवार यांनी स्वागत केले.
ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांची उभी आणि गोल रिंगणे उद्या पासून सुरू होणार आहेत. पालखीतील रिंगण सोहळ्यामुळे वारीची उत्कटता वाढत जाणार आहे.