मुंबई । काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची राज्यात बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतील एक फोटो नुकताच राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत मुलाखतीविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे.
या मुलाखतीविषयी सांगतांना संजय राऊत यांनी सोशल मिडियाच्या पोस्टमध्ये म्हटलं कि, ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामनासाठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली..उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोनापासून राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले” असं संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतलेली ही मुलाखत २५ आणि २६ जुलै अशी दोन भागांमध्ये पाहता येणार आहे अशी माहितीही संजय राऊत यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली.
मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे @uddhavthackeray
यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली.
सर्वच प्रश्नांना दिलखुलास ऊत्तरे मिळाली..ऊध्दव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले..
मुलाखत 25 26 जुलै रोजी वाचता पहाता येईल. pic.twitter.com/y8SSoAFlhV— Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”