शरद पवार सच्च्या मराठा योद्ध्याप्रमाणे लढत आहेत, कोण म्हणतंय असं??

1
283
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बातमी वाचण्यापूर्वी ही रघुराम राजन यांच्या नावाने काल्पनिक अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तीच्या या भावना आहेत, हे सांगणं गरजेचं…!!

रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आणि जागतिक अर्थतज्ञ रघुराम राजन यांचं नाव वापरून एका व्यक्तीने शरद पवारांना मराठा योद्धा असं म्हणत त्यांच्या लढवय्यापणाचं कौतुक केलं आहे. शरद पवार जिंकतील किंवा हारतील पण ते एका सच्चा मराठा योद्ध्याप्रमाणे ही लढाई लढत आहेत असं या व्यक्तीने म्हटलं आहे.

‘ते जिंकतील किंवा ते हारतील मात्र शरद पवार ही लढाई एका सच्चा लढवय्या मराठ्यासारखे लढत आहेत. पवार सध्या प्रत्तेक चुकीच्या गोष्टीविरोधात लढत आहेत. ते सध्या एकाच वेळी मोदी शहा यांच्या क्रुरशक्तीविरोधात लढत आहेत. तसेच कुटुंबातील गद्दारांविरोधात लढत आहेत. तर दुसर्‍या बाजुला पवार त्यांचे वय आणि वृद्धापकाळाने आलेल्या आरोग्याच्या समस्यांविरोधात लढत आहेत’ असे ट्विट सध्या राजन यांच्या नावाने सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या वयोमानानुसार त्यांच्या लढाऊबाण्याचं सर्वत्रच कौतुक होत आहे. विधानसभा निवडणुकांच्या काळात पवार यांनी मी काय म्हातारा झालोय काय असं म्हटलं होतं. पण त्यानंतरच्या सर्व घटनांनी पवार अजुन तरुणच असल्याचं दाखवून दिले आहे. यामुळेच राजन यांनीही पवार यांचं कौतुक केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here