शिक्षकांनी चक्क महायज्ञाला अर्पण केली ‘पदवी’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी | लातूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या शिक्षकांनी एका अनोख्या महायज्ञाचे आयोजन करून आंदोलन केले. महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. हे सर्व शिक्षक विनाअनुदानित शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आले आहेत. मात्र या विनाअनुदानित शाळांना अनुदान नसल्यामुळे आम्ही विनावेतन नोकरी करीत आहेत.त्यामुळे विना अनुदान शाळांना शंभर टक्के अनुदान देण्याची बुद्धी शासनाला येवो यासाठी या शिक्षकांनी महायज्ञाचे आयोजन केलं होते. यावेळी संतप्त शिक्षकांनी आपली पदवी महायज्ञात टाकून आंदोलन केले.

“ज्या पदवीचा नोकरी लागूनही उपयोग होत नसेल तर ही पदवी काय कामाची ” असा संतप्त सवाल करीत शिक्षकांनी आपल्या पदव्या या महायज्ञात टाकून दिल्या. या यज्ञाशेजारी शिक्षकांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ज्यावर ‘तळतळाट शिक्षकांचा, निषेध शासनाचा’ असा मजकूर लिहिला होता.

कनिष्ठ महाविदयालय कृती समितीचे प्रा.मारूती सूर्यवंशी, गोविंद शिंदे, इस्माईल शेख, अनिता मोठे आदींसह विनाअनुदान शिक्षक-शिक्षिका या महायज्ञात सहभागी झाले होते.

Leave a Comment