शिवसेनेचे नाव ‘ठाकरे सेना’ करा : उदयनराजेंचे टीकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर भाष्य केले. यावेळेस त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. आता शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना करा, अशी टीका उदयनराजे यांनी केली. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोईचे राजकारण केले. महाशिवआघाडीतील ‘शिव’ का काढून टाकले, असा सवाल करतानाच महाराजांचे नाव घेत असाल तर त्या प्रमाणे वागा, असा सल्लाही उदयनराजेंनी शिवसेनेला दिला आहे.

आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर बोलावे असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्तर देताना उदयनराजे यांनी शिवसेनेचे महाराजांवरील प्रेम बेगडी असल्याचे दाखले दिले. जेव्हा सोईचे असेल, तेव्हा महाराजांचेन नाव घ्यायचे आणि सोईचे नसेल तेव्हा ते काढून टाकायचे ही शिवसेनेची नीती असल्याचे उदयनराजे म्हणाले. या वेळी उदयराजे यांनी या वादग्रस्त पुस्तकाचाही निषेध केला.

शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारायला आले होते का, असा सवाल त्यांनी केला. यांनी महाशिवआघाडी, शिव का काढून टाकले?, सोई प्रमाणे वापर करायचा सोईप्रमाणे महाराजांचं नाव काढून टाकायचं. शिववडा, हे वडा तो वडा. छत्रपती शिवाजी महाराजांना आदराचे स्थान आहे आणि तुम्ही वडापावला महाराजांचे नाव देता, अशा शब्दांत उदयराजेंनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले.

 

Leave a Comment