नागपूर | ‘माझ्या दारात एक आंबा आहे त्या आंब्याची फळे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली आहेत’ या वक्तव्याने भिडे गुरुजींना गोत्यात आणले आहे. भीमा कोरेगाव दंगलीत कथित सहभागाचे आरोप भिडे गुरुजींवर आहेत. भीमा कोरेगाव दंगली पासून भिडे गुरुजी सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेच्या मध्यमागी असतात. अशातच मागील महिन्यात नाशिकात भिडे गुरुजींनी आंब्याचे वक्तव्य केले होते.
भिडे गुरुजीच्या या वक्तव्यावर पीसीपीएनडीटी समिती नेमण्यात आली होती. समितीने भिडे गुरुजींना पीसीपीएनडीटी कायद्याच्या सेक्शन २२ चे उल्लंघन केल्याने दोषी ठरवले आहे. समिती गुरुजींच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. दरम्यान विरोधकांनी भिडे गुरुजींना अटक करा अथवा विधिमंडळ चालू देणार नाही असा इशारा दिला आहे.