मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हे पिता पुत्राचे सरकार आहे. हे जनतेचे सरकार नाही. जर आज हा मंत्रिमंडळ विस्तार झाला नसता तर त्यांच्या मंत्र्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असता. काही मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात ‘मी मंत्री होत आहे’ अशी घोषणा आधीच केली होती.
आम्हाला कोणतेही आमंत्रण नाही
आदित्य ठाकरे मंत्री होण्याच्या प्रश्नावर भाजप नेते म्हणाले की हे तर होणारच होते. उद्धव यांच्यावर निशाणा साधत भाजप नेते म्हणाले की, एका मुलाने आपल्या वडिलांच्या पाठिंबा देण्यासाठी आपले विचार संपवले.हे धोका देणारे सरकार आहे. मुंबईत असूनही या समारंभास उपस्थित न राहिल्याचा मुद्यावर विचारले असता मुनगंटीवार म्हणाले की, ‘आम्हाला कोणतेही आमंत्रण आले नाही किंवा कोणताही फोन आला नाही. आम्ही त्यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या. मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. त्यांनाही आमंत्रित केले नव्हते.
. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या दीड महिन्यात अजित पवार यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बंडखोरी केली आणि 23 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तथापि, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार पडल्यामुळे त्यांना 26 नोव्हेंबरला राजीनामा द्यावा लागला.