सोलापूर प्रतिनिधी | राज्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला ४ हजार रुपये दर जाहीर केल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शेतकरी परिषदेमध्ये राज्य सरकारला दिला.
आज पंढरपूर इथे संत तनपुरे महाराज मठामध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातून हजारो शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून पाऊस शेतकऱ्याकडे पाठ फिरवतोय. त्यातच जेमतेम पावसाच्या पाण्यात शेतकरी पिकांचे उत्पादन घेत आहेत. पण त्यांच्या कोणत्याही मालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कंटाळून गेले आहेत . तसच त्यांच्या उसाच्या पिकाच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे आता यंदा जर राज्यसरकारने शेतकऱ्यांच्या उसाला ४ हजार रुपये भाव दिला नाही. तर उसाला कोयता लावून देणार नाही. असा धमकी वजा इशारा रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे.