Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Senior Citizen Saving Scheme : केंद्र सरकारकडून नुकतेच लोकांना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. सरकारने गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) काही लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या तिमाहीसाठी असेल. यासाठीच्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्स किंवा 0.3 टक्के वाढ करण्यात आली आहे.

Pradhan Mantri Senior Citizen Saving Scheme in India

अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीसाठी आता Senior Citizen Saving Scheme ला 7.6 टक्के व्याज मिळणार आहे. यावर आतापर्यंत 7.4 टक्के व्याज दिले जात आहे. चला तर मग या बाबत सविस्तरपणे जाणून घेउयात …

>> खाली दिलेल्या योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना मिळणार फायदा :

1. पोस्ट ऑफिसमधील 3 वर्षांच्या FD वर : सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत पोस्ट ऑफिसमधील तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.3 टक्क्यांनी वाढ केली आहे. या दुरुस्तीनंतर पोस्ट ऑफिसमध्ये तीन वर्षांच्या ठेवीवर 5.5 टक्के व्याज मिळणार आहे. आतापर्यंत हा दर 5.5 टक्के होता.

Senior Citizen Saving Scheme (SCSS)- Eligibility & Interest Rate

2. Senior Citizen Saving Scheme : या योजनेच्या व्याजदरात 20 बेस पॉइंट्सनी वाढ करण्यात आली आहे. आता ते 7.4 टक्क्यांवरून 7.6 टक्के करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. Senior Citizen Saving Scheme योजनेमध्ये गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत सूट देखील मिळेल. तसेच या योजनेमध्ये जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी पैसे गुंतवता येतील.

3. किसान क्रेडिट कार्ड (KCC) : यावर आधी 6.9 टक्के व्याज दिले जात होते, जे आता 7.0 टक्के असेल. तसेच त्याच्या मॅच्युरिटीचा कालावधी 124 महिन्यांऐवजी 123 महिने असेल.

Senior Citizen Savings Scheme: With 7.4% Interest Rate, Retirees Can Get Guaranteed Return. Here's How

>> या योजनांमध्ये कोणताही बदल नाही :

1. PPF : पगारदारांमध्ये सर्वाधिक पसंतीची बचत योजना PPF आहे. सरकारने या योजनेचा व्याजदर 7.1 टक्के कायम ठेवला आहे.

2. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) : याशिवाय नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वरील व्याजदरही 6.8 टक्के ठेवण्यात आला आहे.

3. पाच वर्षांची रिकरिंग डिपॉझिट्स (RD) : पाच वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिट्स (RD) : त्याच वेळी, पाच वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिट्सवर आधीप्रमाणेच 5.8 टक्के व्याज मिळणे सुरू राहील.

4. सुकन्या समृद्धी योजना (SSY) : याशिवाय सुकन्या समृद्धीच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. Senior Citizen Saving Scheme

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/govt-schemes/senior-citizens-savings-scheme

हे पण वाचा :

Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!! कसे ते जाणून घ्या

Sukanya Samriddhi Yojana म्हणजे काय ??? त्यावरील व्याजदर जाणून घ्या

Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत

RBI च्या रेपो वाढीचा थेट परिणाम आपल्या खिशावर कसा होणार ते समजून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाली वाढ, पाहा ताजे दर