Wednesday, February 1, 2023

मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेनेसाठी आणि धनुष्यबाण चिन्हासाठी जोरदार प्रयत्न केले जात असतानाच शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. मला कुत्रा ही निशाणी दिली तरी मी निवडणूक जिंकू शकतो असं त्यांनी म्हंटल. औरंगाबादेत आज हिंदु गर्व गर्जना यात्रेदरम्यान मेळावा घेण्यात आला. यावेळी सत्तार बोलत होते.

मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन. हा कमजोर कमकुवत माणसाला सपोर्ट लागतो. आपण कार्यकर्ता आहोत. जो कार्यकर्ता असतो त्याला कशाची भीतीही वाटत नाही. कार्यकर्ता पद कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. आमदारकी, खासदारकी मंत्रिपद जातं. पण कार्यकर्ता पद जात नाही. जसे जसे काम केलं तशी शक्ती मिळते. आणि माणूस राजकारणाच्या ट्रॅक वर मग कितीही अडथळे आले तरी सरळ गाड्या मुंबईपर्यंत जातात. आणि एकदा जनतेनं स्वीकारलं नाही तर वखरावरही कुणी ठेवत नाही, असं वक्तव्य सत्तारांनी केलंय.

- Advertisement -

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोबत मैत्रीपूर्ण निवडणूक व्हावी अशी मागणी सत्तार यांनी यावेळी केली. सर्व जिल्ह्यात वेगेवेगळी परिस्थिती आहे मात्र माझ्या तालुक्याची अडचण दूर करण्यासाठी मी याबाबत मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे असं सत्तार म्हणाले. दुसरा पक्षच नाही इथे मग कशाला कोणाला जिवंत करायचं असेही त्यांनी म्हंटल.