बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : वाळूने भरलेला हायवा ट्रक सोडण्यासाठी १ लाख रूपयांची लाच घेताना गेवराई येथील नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे व इसम माजीद शेख यांना रंगेहाथ पकडले. गेवराई येथे ही कारवाई झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.राज्यात अवैध वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. या विषयीचा प्रश्न विधानसभा अधिकवेशनात देखील मांडण्यात आला होता.