औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा मंगळपासून सुरू झाल्या. २१२ परीक्षा केंद्रांवर १ लाख २७ हजार ७८७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
पदवी अभ्यासक्र माच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांना मंगळवार, १६ मार्चपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील २१२ केंद्रांवर परीक्षांना सुरूवात झाली. विद्यापीठाने आॅनलाईन व आॅफलाईन असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. आॅफलाईन परीक्षा देणाऱ्यांसाठी होम सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. तर आॅनलाईन परीक्षा मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे देता येईल. कोवीडसंदर्भात योग्य काळजी घेउन परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागो १० अधिकारी, कर्मचाऱ्यांची समन्वयक समिती स्थापन केली आहे. यात रामेश्वर बंकल्लू, संदीप दरबस्तवार, प्रकाश मालकर, जिजाभाउ देशमुख, साहेबराव मुळे, सचिन पेरकर, अशोक वैष्णव, प्रवीणा जावळे, मनोहर दास, विजय बोडके, इस्तियाक खान, महेश देशमुख, सुभाष जाधव, कोमल गवळी, ए.यू. पाटील, राजेंद्र गांगुर्डे, महेंद्र पैठणे, दत्तात्रय वाल्हेकर, दिनकर जगदाळे, इलियास शेख यांचा समावेश आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.