LIC च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा दरमहा 1 लाख रुपयांची पेन्शन !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC कडून ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना चालवल्या जातात. LIC कडून मनी बँक, पेन्शन, जीवन विमा इत्यादी श्रेणींमध्ये अनेक नवीन योजना ऑफर केल्या जातात. आज आपण एलआयसीच्‍या एका अशा स्‍कीमबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये दरमहा 1 लाख रुपयांची पेन्शन मिळू शकेल.

तर एलआयसीच्‍या या योजनेचे नाव आहे जीवन शांती योजना. ज्या लोकांना लवकर निवृत्त व्हायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना खूपच फायदेशीर ठरेल. यामध्ये दर महिन्याला, 3 महिने, 6 महिने किंवा 1 वर्षाच्या अंतराने पैसे घेता येतील. मात्र यामध्ये पेन्शन मिळवण्यासाठी हा प्लॅन खरेदी करून 1-12 वर्षे वाट पहावी लागेल.

LIC Jeevan Shanti Plan : सेवानिवृत्ति के बाद प्रतिमाह मिलेंगे 12,000 रूपए

गुंतवणुकीसाठीची मर्यादा

एलआयसीच्या या योजनेची खास बाब अशी कि यामध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. यामध्ये आपण जितके जास्त पैसे गुंतवाल तितकी जास्त पेन्शन मिळेल. यासाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर एक कॅल्क्युलेटर देखील देण्यात आला आहे. ज्याद्वारे आपल्याला पेन्शन मिळवण्यासाठी किती रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागेल ते पाहता येईल.

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

अशा प्रकारे मिळवा 1 लाख रुपयांची पेन्शन

जर आपल्याला दरमहा एक लाख रुपयांची पेन्शन हवी असेल तर 1 कोटी रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागेल. जो खरेदी केल्याच्या 12 वर्षांनंतर दरमहा 1.06 लाख रुपयांची पेन्शन मिळू लागेल. तसेच जर हे पैसे फक्त 10 वर्षांसाठी जमा केले तर मॅच्युरिटीवर 94,840 रुपये मासिक पेन्शन मिळेल.

digital payments: Cash in circulation at a decadal high even as digital  payments soar - The Economic Times

अशा प्रकारे मिळवा 50 हजार रुपयांची पेन्शन

जर आपल्याला 50,000 रुपयांची मासिक पेन्शन हवी असेल तर फक्त 50 लाख रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागेल. त्याचा मॅच्युरिटी कालावधी देखील 12 वर्षांचा असेल. त्यानंतर प्रत्येक महिन्याला 53,460 रुपयांची पेन्शन मिळेल. जर मॅच्युरिटी कालावधी 10 वर्षांपर्यंत कमी केला तर पेन्शन देखील कमी होईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans/LIC-s-New-Jeevan-Shanti-(Plan-No-858)-(UIN-512N338

हे पण वाचा :
118 वर्षे जुन्या City Union Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!