सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 531 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 5 हजार 107 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 19 हजार 60 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 70 हजार 845 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 48 हजार 52 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3 हजार 730 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 32 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
जिल्हाधिकारी शेखरसिंह यांची फलटण, माण तालुक्यात गावांना भेटी
फलटण, माण तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दोन्ही तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरु करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षांना आज भेटी देवून तिथल्या व्यवस्थेची पहाणी केली.यावेळी पहाणी प्रसंगी आमदार दिपक चव्हाण, प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसीलदार बाई माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.