सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 875 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील सर्वाेच्च उंच्चाकी 1 हजार 828 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 22 हजार 852 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 41 हजार 312 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 818 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3294 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी दिवसभरात 41 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
म्युकरमायकोसिसचा पहिला मृत्यू
सातारा जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचा पहिला मृत्यू झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात बाधितावर उपचार सुरू होता. जिल्ह्यात सध्या 21 म्युकरमयकोसिसचे बाधित रूग्ण उपचार घेत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.