हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : जर आपण फेब्रुवारीमध्ये काही कामानिमित्त बँकेमध्ये जाणार असाल तर आधी बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट पहा. कारण फेब्रुवारी महिन्यातील 28 दिवसांपैकी 10 दिवस बँका बंद असतील. हे जाणून घ्या कि, फेब्रुवारी महिन्यात सणासुदीमुळे विविध राज्यांमध्ये अनेक बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. देशातील बँकांना यावर्षी अनेक सुट्या असतील. यातील काही सुट्ट्या या फक्त काही राज्यांमध्ये तर काही राष्ट्रीय पातळीवरील असतील.
भारतात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. तसेच दर रविवारी देखील बँकांना सुट्टी असते. अशाप्रकारे बँका 10 दिवस बँका बंद राहतील. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सेवा फेब्रुवारी महिन्यात काही दिवसांसाठी मर्यादित असतील. RBI कडून आपल्या अधिकृत वेबसाइट https://www.rbi.org.in/ वरून बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट जरी करण्यात आली आहे. Bank Holiday
हे जाणून घ्या कि, या सर्व सुट्ट्या देशभरात एकाच वेळी लागू होणार नाहीत. प्रत्येक राज्यांनुसार वेगवेगळ्या सुट्ट्या असतील. तसेच यामधील काही सुट्ट्या या स्थानिक पातळीवरील असतील. देशभरातील विविध राज्यांमध्ये अनेक सण साजरे केले जातील. ज्यामध्ये हजरत अली जयंती, गुरु रविदास जयंती, लुई न्गाई नी, महाशिवरात्री, लोसार सारखे महत्त्वाचे सण आहेत. Bank Holiday
फेब्रुवारी 2023 मधील बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा (Bank Holiday)
5 फेब्रुवारी: हजरत अली जयंती, गुरु रविदास जयंती (रविवार)
11 फेब्रुवारी: दुसरा शनिवार
12 फेब्रुवारी : रविवार
15 फेब्रुवारी: लुई न्गाई नी (मणिपूर)
18 फेब्रुवारी : महाशिवरात्री
19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (रविवार)
20 फेब्रुवारी: राज्यत्व दिन (अरुणाचल प्रदेश, मिझोरम)
21 फेब्रुवारी: लोसार (सिक्कीम)
25 फेब्रुवारी : चौथा शनिवार
26 फेब्रुवारी : रविवार
हे पण वाचा :
Bank FD : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेच्या FD वर मिळत आहे 7.40% पर्यंत व्याज !!!
BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे
PM Svanidhi Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार देत आहे विना गॅरंटी कर्ज, अशा प्रकारे मिळवा फायदा
New Business Idea : सतत मागणी असलेल्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये
Post Office Tax Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांमधील गुंतवणूकीद्वारे वाचवता येईल टॅक्स