हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Richest Women in India : हुरुन इंडिया आणि कोटक प्रायव्हेट बँकिंग यांच्याकडून संयुक्तपणे भारतातील सर्वात श्रीमंत महिलांची लिस्ट पब्लिश करण्यात आली आहे. या नुसार गेल्या वर्षभरात नाईकाच्या फाल्गुनी नायरच्या संपत्तीत सुमारे 1000 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या लिस्टमध्ये त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत या महिलांच्या संपत्तीच्या आधारे ही लिस्ट तयार करण्यात आली आहे. चला तर मग त्याविषयी कर्मवरपणे जाणून घेउयात …
रोशनी नादर मल्होत्रा – देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक HCL आहे. या कंपनीच्या अध्यक्षा असलेल्या रोशनी नाडर यांच्याकडे 84,330 कोटी रुपयांची संपत्ती आहे. या वर्षीच्या त्यांच्या संपत्तीत 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या लिस्टमध्ये त्या सलग दुसर्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. Richest Women in India
फाल्गुनी नायर – यांच्या संपत्तीत 968 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे 57,520 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्या भारतातील दुसऱ्या आणि जगातील 10 वी सेल्फमेड सर्वात श्रीमंत महिला आहेत. Richest Women in India
किरण मुझुमदार शॉ – या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बायोकॉनच्या सीईओ असलेल्या किरण मुझुमदार शॉ आहेत. त्यांच्याकडे सुमारे 29,030 कोटी रुपयांची संपत्ती आहे. Richest Women in India
नीलिमा मोटापर्थी – हैदराबाद येथील दिवी लेबोरेट्रीजची डायरेक्ट ऑनबोर्ड (कमर्शियल) आहेत. या लिस्टमध्ये त्या चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 28,180 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेली 5 वर्षे त्यांनी या कंपनीमध्ये कॉर्पोरेट फायनान्स आणि इन्व्हेस्टर रिलेशनचे पद सांभाळले आहे. Richest Women in India
राधा वेंबू – झोहोच्या श्रीधर वेंबूची बहीण असलेल्या राधा यांनी या लिस्टमध्ये पाचवे स्थान पटकावले आहे. त्यांच्याकडे 26,260 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्या सध्या झोहो मेलच्या प्रॉडक्ट मॅनेजर आहेत. Richest Women in India
लीना गांधी तिवारी – देशातील सर्वात परोपकारी महिलांपैकी एक मानल्या जाणाऱ्या लीना या ग्लोबल फार्मास्युटिकल्स अँड बायोटेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्याकडे सुमारे 24,280 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांनी 2021 मध्ये तब्ब्ल 24 कोटींची देणगी दिली आहे. Richest Women in India
अनु आगा आणि मेहर पुदुमजी – थर्मॅक्सच्या अनु आगा आणि मेहर पुदुमजी या लिस्टमध्ये 14,530 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह 7व्या स्थानावर आहेत. मेहर यांना 2003 मध्ये कंपनीचे चेअरपर्सन बनवण्यात आले. त्याच वेळी, अनु आगा यांनी 2018 मध्ये वयाच्या 76 व्या वर्षी संचालक मंडळावरून पायउतार झाल्या. मेहर ही अनु आगा यांची मुलगी आहे. Richest Women in India
नेहा नारखेडे – कॉन्फ्लुएंटच्या नेहा नारखेडे या लिस्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 13,380 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांनी नुकताच या लिस्टमध्ये प्रवेश केला आहे. Richest Women in India
वंदना लाल – या लिस्टमध्ये नाव असलेल्या वंदना डॉ. लाल या पॅथलॅब्सच्या कार्यकारी संचालक आहेत. याशिवाय वंदना लाल या कंपनीच्या रिसर्च अँड डेवलपमेंट हेड आहेत. त्यांच्याकडे 6,810 कोटी रुपयांची संपत्ती आहे. Richest Women in India
रेणू मुंजाल – Hero MotoCorp च्या माजी कार्यकारी संचालक आणि Hero Fincorp च्या व्यवस्थापकीय संचालक रेणू मुंजाल यांच्याकडे 6,620 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्या दहाव्या स्थानावर आहेत.
हे पण वाचा :
George Floyd च्या हत्येप्रकरणी आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली शिक्षा !!!
Bank of Baroda च्या FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा
भारतातील IT Industry मधील सर्वाधिक पगार घेणारे 5 सीईओ कोण आहेत ???
31 जुलैपर्यंत ITR भरा; अन्यथा होईल ‘इतका’ दंड