100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 100 व्या ऐतिहासिक अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवारांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रसाद कांबळी यांनी शरद पवारांची भेट घेऊन यंदाच्या 100व्या ऐतिहासिक अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. ही विनंती शरद पवार यांनी स्वीकारल्याची माहिती शरद पवार यांनी ट्विटरवरून दिली.

प्रसाद कांबळी यांच्या विनंतीचा मी आनंदपूर्वक स्वीकार करीत आहे, असे पवारांनी म्हंटले आहे. १०० व्या ऐतिहासिक अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल भूषवणार आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते. १९०५ साली पहिले नाट्यसंमेलन पुण्यात झाले. त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते. ९९ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन नागपूरला प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांची निवड होणार की अभिनेते आणि नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांची निवड होणार हे ठरत नव्हते. अखेर नाट्य परिषदेने १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांची निवड केली.

Leave a Comment