कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सक्तीच्या फी वसुलीच्या विरोधात कराडच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर पालकांचे निषेध आंदोलन चालू आहे. खरं तर लॉकडाउन मध्ये स्कूल बंद असूनही या पोद्दार इंटरनॅशनल स्कुल कडून सक्तीची 100 % फी ची मागणी करण्यात आली आहे. त्याविरोधात पालकांनी हे आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात दीडशे ते दोनशे पालक उपस्थित आहेत.
50% फी देण्याची पालकांची तयारी आहे तरीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकले जात असल्याने पालक संतप्त झाले असुन या सक्तीच्या फि वसुली विरोधात अडीशे ते तीनशे पालकांनी शाळेसमोर निषेध आंदोलन सुरू केला आहे स्कूल मॅनेजमेंट व शिक्षण विभागाने दखल न घेतल्यास कराड मधुन यापुढील ऍडमिशन होऊ देणार नसल्याचा पालकांचा निर्धार असुन स्कूल च्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा नेण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे
दरम्यान, पालकांच्या फी विरोधी आंदोलनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पाठिंबा दिला असून शाळेच्या शक्तीच्या फी वसुलीच्या विरोधात शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’