BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL कडून ग्राहकांना प्रीपेड प्लॅन व्यतिरिक्त ब्रॉडबँड कनेक्शनसाठी देखील चांगले प्लँन्स ऑफर केले जातात. मोबाईल सेवेच्या बाबतीत जरी बीएसएनल इतर कंपन्यांपेक्षा मागे असला तरी देशातील ब्रॉडबँडच्या सेवेमध्ये तो एक प्रमुख कंपनी आहे. त्यामुळे जर आपल्यालाही कमी किंमतीमध्ये चांगला ब्रॉडबँड प्लॅन हवा असेल तर बीएसएनल हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.

BSNL कडून ‘भारत फायबर’ नावाने ब्रॉडबँड सेवा दिली जाते. यामध्ये ग्राहकांना 749 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये आपल्याला 100 Mbps च्या स्पीडसह OTT बेनेफिट्स देखील मिळतात. मात्र, हे लक्षात घ्या कि, हा प्लॅन सर्व सर्कर्ल्समध्ये उपलब्ध नसेल.

BSNL Broadband Plans: Limited/Unlimited Plans for Home, Business Users » Think Blog

या 749 रुपयांच्या प्लॅनला ‘सुपरस्टार प्रीमियम-1’ असे म्हंटले जाते. या प्लॅनमध्ये 1000GB किंवा 1TB डेटासह 100 Mbps इंटरनेट स्पीड मिळेल. तसेच फेअर यूसेज पॉलिसी (FUP) डेटा संपल्यानंतर, युझर्सना 5 Mbps चा इंटरनेट स्पीड मिळेल.

BSNL launches work from home broadband plan with 5GB

याशिवाय, BSNL युझर्सना व्हॉईस कॉलिंगसाठी फ्री फिक्स्ड लाइन कनेक्शन देखील मिळेल, मात्र यासाठी कंपनीकडून टेलिफोन सेट दिला जाणार नाही. युझर्सना तो बाजारातून विकत घ्यावा लागेल. इतर खाजगी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सप्रमाणेच (ISPs) BSNL देखील 3.3TB मंथली FUP डेटा ऑफर करत आहे.

Now, get 1,000 mbps download speed on BSNL broadband | Business Standard News

BSNL च्या 749 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युझर्सना OTT प्लॅटफॉर्म SonyLIV Premium, ZEE5 Premium, Voot आणि YuppTV-Live चे सब्सक्रिप्शन देखील फ्री मध्ये मिळेल. मात्र इथे हे लक्षात असू द्यात की या प्लॅनच्या किंमतीमध्ये जीएसटीचा समावेश नाही. GST लावल्यानंतर या प्लॅनसाठी युझर्सना 900 रुपये मोजावे लागतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/services/broadband/

हे पण वाचा : 

Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी??? त्याविषयी जाणून घ्या

e-PAN Card : आता अवघ्या काही मिनिटांत डाउनलोड करता येईल e-PAN Card, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

Airtel Price Hike : Airtel च्या ग्राहकांना पुन्हा बसणार धक्का, प्रीपेड प्लॅन्स आणखी महागणार

Business Idea : अशा प्रकारे फुलांच्या व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे !!!

Gold Price Today : सोने-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा

Leave a Comment