कोरोना काळातही मनपाकडून शंभर कोटींची कर वसुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोना पार्श्वभूमीवर यंदा मनपा मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीकरिता लक्ष केंद्रित करता आले नाही. यानंतर देखील कर वसुली शंभर कोटी पार गेली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांकडे मनपाची मालमत्ता कर व पाणीपट्टी पोटी कोट्यवधींची थकबाकी आहे. या तुलनेत कर वसुली होत नसल्याने तिजोरीमध्ये नेहमी खणखणाट असतो.

गतवर्षी कर वसुलीवर मनपाने मोठ्या प्रमाणावर जोर दिला. त्यामुळे पहिल्यांदाच तब्बल ११० कोटी रुपयांची करवसुली प्रशासनाला करता आली. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात ४६८ कोटी रुपये वसूल करण्याचे निश्चित केले. परंतु कोरोना संसर्गामुळे एप्रिलपासून डिसेंबरअखेरपर्यंत केवळ ११ टक्के म्हणजेच ५३ कोटी रुपये वसूल करता आले होते.

आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिनेच शिल्लक असताना मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी टास्क फोर्स समितीची स्थापना केली. या फोर्सच्या माध्यमातून वॉर्ड अधिकारी आणि कर्मचार्यांना कराची वसुली करण्यासाठी कामाला लावले गेले. यासह या फोर्सच्या वतीने देखील बड्या थकबाकीदारांकडून कर वसुली केली गेली. यामुळे ११७ कोटी ५७ लाख ५८ हजार ८६४ रुपये एवढी कर वसुली करता आली. यात ९२ कोटी ८ लाख २७ हजार ५६ रुपये मालमत्ता कर तर २५ कोटी ४९ लाख ३१ हजार ८०८ रुपये पाणीपट्टीचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment