Sunday, June 4, 2023

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गुढ उकलले; माझ्या पोलिस करिअरमध्ये हे प्रकरण आतापर्यंतचे सर्वात अवघड – शिवदीप लांडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. महाराष्ट्र एटीएसच्या डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे. रमेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आपल्या करिअरमधील सर्वांत कठीण केस असल्याचे लांडे यांनी म्हटले आहे.

एटीएसकडून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार सचिन वाझे असल्याचे म्हटले आहे. त्याच्या सांगण्यावरूनच या दोघांनी या कटात सहभाग घेतल्याचा दावा एटीएसने केला आहे. या दोघांना अटक केल्यामुळे एटीएसच्या हाती महत्वाचे धागेदोरे मिळाल्याचे बोलले जात होते. त्यातच शिवदीप लांडे यांनी या प्रकरणाचे गुढ उकलल्याची माहिती देत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

काय म्हणाले शिवदीप लांडे?

अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गुढ उकलले आहे. मी एटीएसमधील सर्व सहकाऱ्यांना सलाम करतो. त्यांनी मागील काही दिवस रात्रं-दिवस काम करून या प्रकरणाचा शोध घेतला. माझ्या पोलिस करिअरमध्ये हे प्रकरण आतापर्यंतचे सर्वात अवघड राहिले आहे, अशी फेसबुक पोस्ट शिवदीप लांडे यांनी टाकली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –