हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्रमध्ये महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यातही मुसळधार पाऊस व दरडी कोसळून नागरिकांचे जीव गेले. तर घरांचे नुकसान झाले. अशांसाठी राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज माहिती दिली असून राज्य सरकारने तातडीची 10 हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर केली आहे. ती उद्या त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी आज दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस होत असून अतिवृष्टी निर्माण झालेली आहे. पावसाचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसला असून अनेक जिल्ह्यामध्ये महापुराची स्थिती उद्भवली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. अशा भागाचा नुकताच राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी पुरग्रस्थांसाठी मदत दिली जाईल असे सांगितले होते. त्यानंतर मंत्री वडेट्टीवार यांनी आज प्रत्यक्ष मदत जाहीर केली.
पूरग्रस्त भागातील कुटुंबांना १०,००० रुपयांची तातडीची मदत देण्याचा निर्णय काल मंत्रीमंडळ बैठकीत झाला. उद्यापासून ही रक्कम खात्यात जमा करण्यात येणार आहे. (1/3) pic.twitter.com/yJswUaYxow
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 29, 2021
यावेळी मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीने जाहीर केलेली मदत हि त्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचे वाटप वाटप केल्यास अनेक आरोप केले जातात. पैसे वाटपात गैरप्रकार झाले. मात्र, आता अशा आरोपांच्या पिंजऱ्यात आम्हाला उभे राहायचे नसून म्हणून आम्ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल अहवाल देण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. हा अहवाल केंद्राला पाठवण्याचे आदेश दिले आहेत.