शंभरी पार : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणात 101. 24 टीएमसी पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाणीसाठ्याची नुकतीच सेंच्युरी पुर्ण झाली असून धरणातील पाणीसाठा शनिवारी सकाळी 101. 24 टीएमसी एवढा साठलेला आहे. कोयना धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी असून कोयना धरणातील शिवाजी सागर जलाशय 96 टक्के भरला आहे.

सध्या धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर काहीसा कमी- जास्त होत असून धरणातील पाण्याची आवक मंदावली आहे. धरणाची सध्या पाणीपातळी 2200 मीटर इतकी झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 4.1 टीएमसीची गरज आहे. यंदा पावसाने जोरदार बॅंटीग धरण क्षेत्रात केलेली आहे.

कोयना येथे 1 जूनपासून 3 हजार 896 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. नवजा येथे 5 हजार 154 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 5 हजार 157 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे देशातील टाॅप पावसाच्या ठिकाणात सातारा जिल्ह्यातील तीन ठिकाणांचा समावेश आहे.

Leave a Comment