दिलासादायक!! राज्यातील ‘हे’ 8 जिल्हे कोरोनामुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना राज्यासाठी 1 दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील तब्बल 8 जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यावेळी महाराष्ट्र कोरोनावर मात करताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील धुळे, परभणी, अकोला, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, भंडारा आणि गोंदिया या 8 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल की कोरोनामुक्ती कडे सुरू असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा आकडा खूपच दिलासादायक आहे. राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्याही घटली आहे. तर बऱ्या होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला बाप्पा च पावला अस म्हणायला हरकत नाही.

You might also like