हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD: केरळमधील सर्वात जुनी खाजगी बँक असलेल्या CSB Bank ने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. नुकतेच बँकेकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, 3 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. हे लक्षात घ्या कि, 1920 मध्ये CSB Bank लिमिटेडची स्थापना कॅथोलिक सीरियन बँक लिमिटेड या नावाने करण्यात आली होती. गेली 102 वर्षे ही बँक अखंड कार्यरत आहे.
असे असतील नवीन FD वरील व्याज दर
आता बँकेकडून 7 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 3% तर 91 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 3.50% व्याज दिले जाईल. तसेच 180 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वर बँक 4.25% हा नवीन व्याजदर देईल. आता एका वर्षाच्या FD वर 5% हा नवीन व्याजदर देण्यात येईल. तसेच आता CSB Bank 1 वर्ष ते 400 दिवसांपेक्षा जास्त मुदतीच्या FD वर 5.50% आणि 400 दिवसांच्या FD वर 6.00% व्याजदर देईल. Bank FD
जास्त व्याज दर कुठे कधी मिळेल ???
आता CSB Bank 400 दिवस किंवा 555 दिवसांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 5.50% तर 555 दिवसांच्या एफडीवर 7% व्याजदर देईल. तसेच 555 दिवसांपासून ते दोन वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या FD वर आता 5.50% तर दोन वर्ष ते 5 वर्षांच्या मुदतीच्या FD वर आता 5.75% व्याज मिळेल. याशिवाय, आता 5 वर्षांपेक्षा जास्त आणि दहा वर्षांपर्यंतच्या FD वर 6% व्याज दिले जाईल. Bank FD
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु केली खास योजना
CSB Bank कडून देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आचार्य डिपॉझिट्स द्वारे सर्वाधिक व्याज दिले जाते. CSB बँक 180 दिवस ते 10 वर्षाच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 4.75% ते 6.50% पर्यंत व्याज देते. मात्र आता बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 555 दिवसांच्या आचार्य डिपॉझिट्सवर 7% व्याज मिळेल.Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dbs.com/in/treasures/common/interest-rates.page
हे पण वाचा :
गेल्या 15 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने दिला 19,900% रिटर्न
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर
फक्त उद्यापर्यंतच घेता येऊ शकेल ICICI Bank च्या ‘या’ योजनेचा लाभ !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर तपासा
खुशखबर !!! SBI कडून झिरो प्रोसेसिंग फीसमध्ये अशा प्रकारे मिळवा लोन