हॉस्टेलला सोडण्याच्या बहाण्याने राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने अल्पवयीन मुलीसोबत केले ‘हे’ कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका हॉस्टेल संचालकाने दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य केले आहे. हा नराधम आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे. या आरोपीने पीडित मुलीला हॉस्टेलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने रस्त्यातच तिच्यासोबत लैंगिक चाळे केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी आंधळगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सुमेध श्यामकुवर असे गुहा दाखल झालेल्या आरोपी नराधमाचे नाव आहे. हा आरोपी मुलींच्या हॉस्टेलचा संचालक आहे. तसेच तो राष्ट्रवादीचा नेता देखील आहे. हि घटना उघडकीस येताच शाळेच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात असलेल्या यशोधन ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारा संचालित महिला समाज गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहते. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास आरोपी सुमेध श्यामकुवर पीडित मुलीच्या घरी गेला होता.त्यावेळी आरोपीने पीडितेच्या वडिलांना फोन करून आपण मुलीला हॉस्टेलमध्ये घेऊन जाण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. यानंतर स्वत: हॉस्टेल संचालकच मुलीला घेऊन जायला आल्याने वडिलांनी मुलीला आरोपीसोबत पाठवले.

यानंतर हा नराधम आरोपी पीडितेला चारचाकी गाडीत बसवून घेऊन गेला. यानंतर काही अंतर गेल्यानंतर आरोपीनं निर्मनुष्य ठिकाणी कार थांबवली. याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला. यानंतर हॉस्टेलमध्ये पोहोचल्यानंतर पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार आपल्या एका मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर त्या मैत्रिणीने पीडितेच्या वडिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली. आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकताच पीडितेच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेच आंधळगाव पोलीस ठाण्यात जाऊन हॉस्टेल संचालक आणि राष्ट्रवादी नेते सुमेध श्यामकुवर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment