सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
फलटण तालुक्यातील सालपे गावच्या हद्दीत वाठार ते लोणंद जाणाऱ्या मार्गावरील सालपे घाटातील वळणावर 20 ते 25 वयोगटातील अज्ञात 7 ते ८ इसमांनी मालट्रक क्रमांक (एम. एच. 12 एचडी- 4892) अशोक लेलँड कंपनीचा ट्रक आडवा मारला होता. मालट्रकचा चालक व त्याच्या सोबतच्या इसमाचे हात दोरीने बांधून, त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल फोन व रोख रक्कम तसेच त्याच्यात कडील मालट्रक व त्यामधील लोखंडी कास्टिंगचे माल असा एकूण 14 लाख 59 हजार तीनशे रुपये किमतीचा माल जबरीने घेऊन गेेले. चालक व त्याच्यासोबत माणसांस आरोपीच्या ताब्यातील विना नंबर अशोक लेलँड कंपनीचा मालक ट्रक मध्ये टाकून (नांदल, ता. फलटण) गावच्या हद्दीत सोडून दिले. याबाबत भाऊसाहेब जिजाबा शिंदे (वय- 32, रा. बाभुळसर खुर्द, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती. याप्रकणात सतिश विष्णू माळी या मुख्य सूत्रधार व अन्य दहा साथीदारांना अटक करण्यात आले आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण तानाजी बरडे, सातारा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सचिन राऊळ, उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 5 वेगवेगळे तपास पथके तयार करून सदर गुन्हा उघडकीस देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपास पथकाने घटनास्थळापासून जाणारे सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले . तसेच फिर्यादी त्याच्यासोबत सांगली येथून आलेला इसम त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता. त्याच्या बोलण्याध्ये विसंगती दिसून आली, त्यामध्ये फिर्यादी सोबत आलेला इसम हा काहीतरी खोटे बोलत असल्याचे पोलिसांना जाणवले. तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडे अधिक सखोल विचारपूस केली असता. त्याने सांगली जिल्ह्यातील त्याच्या गावाकडील व परिसरातील साथीदारांसह कट करून गुन्हा केल्याचे कबूल केले.
यावेळी गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा चोरीस गेलेला मुद्देमाल नागपुर एमआयडीसी अहमदनगर येथे विक्री करता घेऊन गेला होता. त्याप्रमाणे अहमदनगर येथील पोलिसांची मदत घेऊन एमआयडीसीमधील संबंधित कंपनीत जाऊन खात्री केली असता. गुन्ह्यातील चार आरोपी हे चोरीस गेलेला मुद्देमाल, यापैकी काही एक टन संबंधित कंपनीत विक्री करून पुढे गेल्याचे समजले. तेव्हा ताब्यात असलेल्या संबधितांकडे अधिक विचारपूस केली असता. त्याने बाकीचे आरोपी सांगली जिल्ह्यात त्याच्या गावी गेल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तयार करण्यात आलेले तपास पथकामध्ये योग्य नियोजन करून अहमदनगर येथून चार, सांगली जिल्ह्यातील कवलापूर, कुपवाड, मिरज व कवठेमहाकाळ अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच चोरीस गेलेला 6 लाख रुपये किमतीचा मालट्रक, 8 लाख 50 हजार रुपये किमतीचे सात टन वजनाची करारो इंडिया कंपनीचे लोखंडी कास्टिंग जप्त केले. तसेच 7 हजार 800 रुपये किमतीचे 2 मोबाइल हँडसेट असा एकूण 14 लाख 59 हजार तीनशे रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा