११ तोळे सोन्यावर चोरांनी मारला डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे ,
तासगाव तालुक्यातील येळावी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन-तीन घरांत घरफोडी केली. अशोक आत्माराम मारवाडी यांच्या घरातील अंदाजे ११ तोळ्यांचे सोन, चांदीचे दागिने आणि १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. तसेच इतरही दोन, तीन घरांत चोरीचा प्रयत्न केला आहे. याबाबत रात्री ऊशिरा तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु होते.
याबाबत अधिक माहिती अशी, येळावी येथील कुंभार गल्लीत अशोक मारवाडी यांचे घर आहे. बुधवारी त्यांच्या घर बंद होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मारवाडी यांच्या घराचे कुलूप फोडून चोरी केली. तिजोरीसह अन्य महत्वाच्या साहित्याची नासधूस करून सुमारे अकरा तोळ्यांचे दागिने आणि पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली. अशोक मारवाडी यांच्यासह  वसंत पिसाळ, शंकर पिसाळ यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला. चार दिवसांपूर्वी येळावीतीलच नरसिंह मंदिरातील दानपेटई फोडून अज्ञातत चोरट्यांनी सात हजार रुपये लंपास केले होते. त्यानंतर चारच दिवसांत दुसर्‍यांदा चोरीची घटना घडल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

Leave a Comment