हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज हजारो गाड्या चालविल्या जातात. आजही लाखो लोकं रेल्वेनेच प्रवास करण्यात प्राधान्य देतात. दिवाळीमुळे सध्या रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दीचे वातावरण आहे. मात्र अशातच काही प्रवाशांना आज पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागू शकते. कारण आज 23 ऑक्टोबर रोजी रेल्वेने 111 गाड्या रद्द करण्यात केल्या आहेत. रेल्वेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आज रेल्वेने 97 गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. त्याच वेळी, 14 गाड्या या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. जर आपण आज ट्रेनने प्रवास करणार असाल तर घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा. Train Cancelled
रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट
या 111 गाड्या रद्द झाल्यामुळे दिल्ली, काठगोदाम, पुरलिया, आसनसोल, रायपूर, रोहतक, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, म्हैसूर, वाराणसी, पाटणा, नागपूर, तारा, पठाणकोट, बिना, दमोह, हरिद्वार, ऋषिकेश, गोंडा, गोरखपूर. , मुरादाबाद आणि रामनगरसारख्या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Train Cancelled
ट्रेनचे स्टेट्स ऑनलाइन तपासा
रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती ऑनलाइन पुरवली जाते. रेल्वेच्या रद्द, रिशेडयूल आणि डायव्हर्ट केलेल्या गाड्यांची माहिती भारतीय रेल्वे आणि IRCTC च्या वेबसाइटवर उपलब्ध असते. तसेच रद्द झालेल्या गाड्यांची माहिती NTES या App वरूनही घेता येईल. रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटवर किंवा IRCTC च्या https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 या वेबसाइटवर जाऊन कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स तपासता येते. Train Cancelled
अशा प्रकारे मिळेल रिफंड
जर आपण या ट्रेन्समध्ये तिकीट बुक केले असेल तर आता रिफंड मिळ्वण्यासासाठी काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत IRCTC कडून पूर्ण रिफंड मिळेल. ज्यांनी IRCTC द्वारे ऑनलाइन तिकिटे बुक केली आहेत, त्यांची तिकिटे आपोआप रद्द होतील आणि खात्यात पैसे परत केले जातील. ज्यांनी काउंटरवरून तिकिटे खरेदी केली आहेत त्यांना तिथे जाऊन रिफंड मागावा लागेल. Train Cancelled
रेल्वेमधील नोकरी विषयक माहितीकरता इथे भेट द्या : Railway Recruitment
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा