बच्चू कडूंचा राष्ट्रवादीवर ‘प्रहार’, आगामी निवडणुकीच्या काळात शरद पवारांना मोठा दणका

0
2
bacchu kadu and sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या विषयी एक मोठे विधान केले होते. शरद पवार यांच्याकडून आपण बच्चू कडू यांना ओळखत नसल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून राष्ट्रवादी पक्षात खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान आता बच्चू कडू यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षासह तब्बल 12 नगरसेवकांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुका तोंडावर आले असताना राष्ट्रवादीला लागलेली गळती शरद पवारांसाठी मोठी तोट्याची ठरू शकते.

समोर आलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षासह 12 नगरसेवकांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये हेमेंद्र ठाकरे यांच्यासह 10 नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्वांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. यावेळी, हेमेंद्र ठाकरेंसह एका भाजप आणि नऊ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी, तसेच एका स्वीकृत सदस्यांने प्रहारमध्ये पक्षप्रवेश केला. यामुळे आता बच्चू कडू यांची ताकद आणखीन वाढली आहे.

पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलताना, “पदाला आणि सत्तेला महत्व नाही, हेमेंद्र ठाकरे यांच्या प्रवेशामुळे प्रहार आता आणखी मजबूत होईल. विधानसभा निवडणुकीची ही सुरुवात आहे आणि बऱ्याच गोष्टी आम्ही थांबवून ठेवल्या आहेत, जर त्या केल्या तर, स्फोट होईल… आम्ही एक-एक सुतळी बॉम्ब लावू” असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांना दिला आहे. मुख्य म्हणजे, नगरसेवकांनी आगामी निवडणुकांच्या काळात पक्षात केलेल्या प्रवेशामुळे याचा मोठा फायदा बच्चू कडू यांना होऊ शकतो.