Tuesday, June 6, 2023

12 हजारांची लाच! पंचायत समितीचा विस्तार अधिकारी रंगेहाथ ACB च्या जाळ्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यास 12 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सातारा जिल्ह्यातील वडूज येथील ही घटना आहे. संजय विलासराव सोनावले (वय- 56, रा. सातारा, मूळ रा. पाली, ता. कराड) असे सदर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणात ग्रामसेवक हाच तक्रारदार आहे. विस्तार अधिकारी संजय विलासराव सोनावले, हे कार्यालयीन कामकाजामध्ये शुल्लक चुका काढून तक्रारदार यांचा मानसिक छळ करीत असत. तसेच तक्रारदार यांना निलंबित करेन अशा धमक्या देत असत. अशाच एका प्रकरणामध्ये तक्रारदार यांना लोकसेवक यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती.

मात्र सदरच्या कारणे दाखवा नोटीसीच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक संजय सोनावले यांनी तक्रारदार यांच्याकडे 12 हजार रुपयांची लाज मागितली. ती स्विकारताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून विस्तार अधिकारी संजय सोनावले यांना रंगेहाथ पकडले.