हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 26 मे रोजी ९ वर्ष पूर्ण होत आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा विरोधकांना धोबीपछाड देत मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान झाले. खेड्यातील अगदी लहान मुलापासून ते शहरातील उच्चशिक्षित व्यक्तीपर्यंत मोदी चांगलेच लोकप्रिय आहेत. २०१४ ला सत्तेत आल्यापासून मोदींनी देशात अशा अनेक योजना राबवल्या आहेत ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. चला आज आपण त्यातील टॉप ५ योजना जाणून घेऊयात…
1) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून याकडे पाहता येईल. 24 फेब्रुवारी 2019 मोदींनी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत करत आहेत. वर्षातून २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्यातून हे पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होतात.
2) जन धन योजना- Jan Dhan Yojana
१५ ऑगस्ट २०१४ रोजी मोदींनी प्रधानमंत्री जन धन योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत भारतीय नागरिक झिरो अकाउंट उघडू शकतात. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचे काम केंद्र सरकारने केलं. आत्तापर्यंत देशभरातील 48.99 कोटी जनतेने जन धन योजनेच्या अंतर्गत बँक अकाउंट ओपन केलं आहे.
3) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana)-
देशभरातील महिलांचे जीवन बदलण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदींनी मे २०१६ मध्ये उज्ज्वला योजना सुरू केली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्टोव्हच्या धुरापासून मुक्ती मिळावी, आणि त्यांना गॅस मिळावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मोदींनी हि योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात 12 गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते.आणि यातील प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळते.
4) पंतप्रधान गरीब कल्याण योजना- (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana)
कोरोना काळात देशातील गरीब नागरिकांचे जेवणाचे वांदे झाले होते. लॉकडाउनमुळे २ वेळच ऍन मिळणेही गरिबांना कठीण झालं होत. याच पार्श्वभूमीवर मोदींनी 26 मार्च 2020 रोजी पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील सुमारे 80 कोटी लोकांना मोफत मध्ये रेशन मिळत आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता.
5) आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana)
देशभरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही जगातील सर्वात मोठी हेल्थ कार्ड योजना आहे. या कार्डद्वारे पात्र रुग्णाला कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. कोणताही गरीब, मजूर, आदिवासी (SC/ST), बेघर, निराधार, दान किंवा भिक्षा मागणारी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. देशातील कोणताही गरीब, मजूर, आदिवासी (SC/ST), निराधार, किंवा भिक्षा मागणारी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.