मुंबईत 2.50 लाखांत हक्काचं घर मिळणार; सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वप्नांची नगरी, मायानगरी अस ज्या शहराला म्हंटल जातं त्या मुंबईत अनेकजण आपलं पोट भरण्यासाठी येत असतात, अन् कष्ट करत असतात. मुंबई सारख्या जागतिक दर्जाच्या शहरात आपलं स्वतःच अस हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असते. परंतु सध्याच्या महागाईच्या काळात घरांच्या वाढलेल्या अवाढव्य किमतींमुळे अनेकांना ते शक्य होत नाही. परंतु आता राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिले आहे. मुंबईकर झोपडीधारकांना अवघ्या 2 लाख 50 हजार रुपयांमध्ये घर मिळणार आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देत म्हंटल, मुंबई नियमांनुसार आधी आपण 2 हजार या वर्षापर्यंतच्या झोपडीधारकांना मोफत घरं देत होतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कायदा केला. त्या कायद्यानुसार आम्ही 2011 पर्यंतच्या झोपडीधारकांना अंतर्गत पात्र ठरवलं. पण कोर्टाच्या निर्णयानुसार 2000 ते 2011 या कालावधीतील झोपडीधारकांना घरं ही सशुल्क देता येत होतं, निशुल्क देता येत नव्हतं. त्या संदर्भात घरांचे दर निश्चित करायचे होते. ते दर आता आम्ही ठरवले आहेत. आता फक्त अडीच लाख रुपयात घर देणार आहोत.

ही घरे घेत असताना झोपडी धारकांना पीएमएवायचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर भार येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथराव शिदेंच्या नेतृत्त्वात आमचे सरकार समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. असेही फडणवीस यांनी म्हंटल. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांचे मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे हे मात्र नक्की