हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी 127 व्या घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणारे विधेयक आज दिल्लीत लोकसभेच्या अधिवेशनात मांडण्यात आले. तसेच यावेळी घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणाऱ्या विधेयकावर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज लोकसभेच्या अधिवेशनात 127 वी घटनादुरुस्ती विधेयकावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर विधेयकावर मतदान घेण्यात आले. यावेळी विधेयकाच्या बाजूने 386 तर विरोधात शुन्य मते पडली. त्यानुसार अधिवेशनात एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. मंजूर करण्यात आलेले नवे दुरुस्तीचे विधेयक हे उद्या राज्यसभेत हे विधेयक मांडले जाणार आहे.
Lok Sabha passes the Constitution (One Hundred and Twenty Seventh Amendment) Bill 2021 which is for restoring the power of states & UTs to make their own OBC lists pic.twitter.com/7xwblNZB8V
— ANI (@ANI) August 10, 2021
दरम्यान, आज लोकसभेत आज शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारला इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा हटवून सर्वांना स्वतंत्र हक्काचं आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती.