महाराष्ट्रातील ‘या’ १३ जिल्ह्यांत अद्याप एकही कोरोना रुग्ण नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाने आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत आणखी वाढ करत आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजार २९७ वर जाऊन पोहचला आहे. तर आतापर्यन्त ७२ जणांचा जीव कोरोनाने घेतला आहे. अशा वेळी एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील बरेच जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असताना काही जिल्हे असेही आहेत जेथे कोरोना पोहचू शकला नाही आहे. महाराष्ट्रात असे १३ जिल्हे आहेत जेथे आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून या राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच या १३ जिल्हयाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. याचसोबत कोरोनाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यासाठी खास कोरोना कक्ष तयार ठेवले आहेत.

या १३ जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही
१)पालघर
२)नंदुरबार
३)धुळे
४)परभणी
५)नांदेड
६)बीड
७)सोलापूर
८)वर्धा
९)चंद्रपूर
१०)भंडारा
११)गोंदिया
१२)गडचिरोली
१३)रायगड

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment