हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरातील कोणत्याही व्यक्तीला आलेलं आजारपण हे संपूर्ण घरालाच चिंतेत टाकणारं असतं. अशातच आयुष्याची मजा घ्यायला सुरुवात केलेल्या लहान मुलांच्या जगण्यात आजारपणाने लवकर शिरकाव केला तर आणखीनच अवघड होऊन बसतं. खेळण्या-बागडण्याच्या वयात एखाद्या लहान मुलांना दुर्मिळ आजार झाल्यानंतर त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपचारांचा खर्चही प्रचंड असतो. आयुष्याची जमापुंजीही कमी पडेल असे या आजारपणाच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचे आकडे असतात. अशाच एका आजारपणाची ही गोष्ट.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात येणाऱ्या माणिकबागेत राहणारा वीरेंद्र देशमुख हा ७ वर्षांचा मुलगा. दीड वर्षांचा असल्यापासून वीरेंद्रला CGD (सीजीडी) – क्रोनिक ग्रान्यूलोमेट्स डिसीज या दुर्धर आजाराने त्रास द्यायला सुरुवात केली. कोणत्याही इन्फेक्शनला लगेच बळी पडणं आणि रोग प्रतिकारशक्ती कमी असणं ही या आजाराची मुख्य लक्षणं. मागील ४ वर्षांहून अधिक काळ Canditral, Septron आणि Vorier 200 ही औषधं तसेच इतर काही इंजेक्शन घेऊन चिमुकल्या वीरेंद्रने आपला प्रवास सुरु ठेवला आहे. घरातील किंवा बाहेरील कुठल्याही आजारी व्यक्तीच्या संपर्कात आलं की वीरेंद्रला त्याची लागण लगेच होते. ज्यामुळे त्याला आणखीनच त्रास होतो. कोरोनाच्या दीड वर्षांच्या काळात तर केवळ दवाखान्यात दाखवण्यासाठी म्हणूनच वीरेंद्र घराबाहेर पडला आहे. या दीड वर्षांमध्ये वीरेंद्रच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च प्रतिमहिना २० हजार इतका झाला आहे.
अशात शाळा सुरु होणार..आपण शाळेत जाणार याचा आनंद वीरेंन्द्रला खूप झाला. आजारपणामुळे शाळेत जाऊ न शकेलेल्या वीरेंद्रला यावर्षी शाळेत प्रवेश मिळाला होता. या आनंदाने तो घरात खोटवर उडी मारु लागला. अन् यावेळी उडी मारताना त्याचा तोल जाऊन तो पडला. अगोदरच्या आजारपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या वीरेन्द्र अनेल दिवस बेडवर दवाखान्यात आहे.
आजारपणामुळे वीरेंद्रची शारीरिक वाढ खुंटली आहे. त्याच्या हालचालींनाही मर्यादा आहेत. शरीरातील इन्फेक्शन कमी होत नाही तोवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणंही धोकादायक आहे. शरीरात इन्फेक्शन पसरू नये याची काळजी घेत बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं हाच या आजारावरील खात्रीशीर उपाय असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
सध्या वीरेंद्रच्या शरीरात असलेलं इन्फेक्शन कमी करून त्यावर बॉन मॅरो ट्रान्सप्लांटची सर्जरी करण्याचा उपाय पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. शैलेश कानविंदे यांनी सांगितला आहे. या शस्त्रक्रियेसाठीचा एकूण खर्च अंदाजे १३ लाख रुपये आहे. शिवाय औषधखर्चही वेगळा आहेच. वीरेंद्रच्या आई-वडिलांनी आणि कुटुंबियांनी मागील ४ वर्षांत स्वतःच्या परीने १० लाख रुपयांचा खर्च दवाखान्यासाठी उभा केला. मात्र सद्यस्थितीत त्यांनाही वाढीव १३ लाख रुपयांचा खर्च झेपणं अशक्यप्राय आहे. अशा स्थितीत समाजातील दानशूर व्यक्तींनी जमेल तशी मदत करण्याचं आवाहन देशमुख कुटुंबीय आणि हॅलो महाराष्ट्र माध्यम समूहामार्फत करण्यात येत आहे.
मदतीसाठीचे डिटेल्स –
नाव – अमर विजयसिंह देशमुख (वीरेंद्रचे वडील)
बँक – सारस्वत बँक, शाखा – औंध, पुणे
अकाऊंट नंबर – 083203100004107
IFSC कोड – SRCB0000083
मोबाईल नंबर – 9930213042
फोन पे/गुगल पे नंबर -9930213042
ऑनलाईन मदतीसाठीची (CrowdFunding) लिंक – https://www.ketto.org/fundraiser/my-son-is-suffering-from-chronic-granulomatous-disease-cgd-we-need-your-help-to-provide-for-his-treatment?utm_source=external_ct&utm_medium=whatsapp_ct&utm_campaign=campaigner_sac_w20_v3