औरंगाबाद मध्ये धोका वाढतोय; घाटीत आणखी पंधरा कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद, दि.१८: कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.  घाटी रुग्णालयात आतापर्यंत मृत्यू होणाचे प्रमाण हे १०८४ एवढे होते त्यात आता आणखी १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आणखी भर पडली आहे. घाटीत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये बिस्मिल्ला कॉलनी येथील ६५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्ण,  तर कन्नड येथील जैतखेडा येथील ३५ वर्षीय पुरुष, कोलघर येथील ४९ वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला.

तर मुकुंदवाडी येथील विश्रांतीनगर येथील ५९ वर्षीय पुरुष, भावसिंगपूरा येथील ५८ वर्षीय पुरुष,  गवळीपूरा येथील ७९ वर्षीय स्त्री, वैजापूर बालेगाव येथील ५४ वर्षीय पुरुष, सिल्लोड, पळशी येथील ७५ वर्षीय पुरुष, मयूर पार्क येथील ७७ वर्षीय स्त्री, सिल्लोड येथील छत्रपती शिवाजीनगर येथील ३९ वर्षीय पुरुष, राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड येथील ४५ वर्षीय पुरुष, चिकलठाणा, एमआयडीसी शिवछाया येथील ८० वर्षीय पुरुष, गंगापूर-पोटूळ येथील ३५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर याशिवाय बुलढाणा विष्णुवाडी येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाचा देखील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आणखी १५ रुग्णांचे कोरोनाने मृत्यू झाले असल्याचे घाटी प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत घाटी रुग्णालयात एकूण १ हजार ९९ मृत्यू झाले असल्याचेही घाटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment