औरंगाबाद – कोरोनाच्या तिसर्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने ज्येष्ठ नागरिक, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि हेल्थ वर्कर बूस्टर डोस घेण्यासाठी सरसावले आहेत. काल पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवर रुग्णालयांमध्ये दीडशे नागरिकांनी बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने काल शहरातील सर्व आरोग्य केंद्र तसेच पाच रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस देण्याची व्यवस्था केली होती. मात्र पहिल्या दिवशी पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.
आज पासून मात्र बुस्टर डोस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.