नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीला मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपण करण्यास मनाई केल्याची घटना ताजी असताना पेठ आश्रम शाळेत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या (suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये हि घटना घडली आहे.
भारती महादू बेंडकोळी असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. भारतीने पहाटेच्या सुमारास आश्रम शाळेतील छताला असलेल्या पंखा अडकवण्याचा हुकाला दोरी बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. आश्रम शाळेच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेतल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच हरसूल ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी भारतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हरसूल ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येची (suicide) घटना झाली तेव्हा शाळेत पहारेकरी अथवा मुख्यालयातील शिक्षक उपस्थित नसल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?