धक्कादायक ! 17 वर्षीय मुलगी झाली पाच महिन्यांची गर्भवती, युट्यूबवर व्हिडीओ पाहून केला गर्भपात!

0
688
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील एका खेडेगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 17 वर्षीय मुलीचे एका 27 वर्षीय युवकासोबत प्रेमसंबंध जुळले होते. मागच्या दोन वर्षांपासून त्याचं प्रेमप्रकरण सुरू होते. वर्षभरापूर्वी तो युवक नागपुरात कामानिमित्त आला होता. एमआयडीसी परिसरात भाड्याने खोली करून राहू लागला. त्यामुळे या दोघांमधल्या भेटीगोटी कमी झाल्या. पण, तरीही ते संधी मिळेल तेव्हा एकमेकांना भेटत होते. हा युवक कधी-कधी नरखेडला जात असे, तर कधी-कधी ती तरुणी नागपूरला येत असे. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी त्याला भेटायला नागपूरला आली. रात्री त्याच्या खोलीवर थांबली. दोन-तीन दिवस ती इकडं थांबली होती. त्यावेळी त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले आणि यातूनच ती गरोदर राहिली. तिला मळमळ, उलटीचा त्रास होऊ लागला.

गर्भपात करण्यासाठी युट्युबचा घेतला आधार
ही बाब मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने याबद्दल त्या युवकाला सांगितले. यानंतर तो तरुण रुग्णालयात काम करत असल्यानं त्यानं काही औषधे तिला सांगितली. तिने ती औषध खाल्ली पण, काही परिणाम झाला नाही. चार-पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर ती हादरली. आता काय करावे तिला काही सुचेना.यानंतर तिने युट्युबवर गर्भपात कसा करतात यासंबंधित काही व्हिडिओ पहिले.

काढा पिऊन मुलगी बेशुद्ध
या व्हिडिओद्वारे पीडित मुलीला काही गावरानी औषधांची माहिती मिळाली. यानंतर तिने त्याद्वारे काढा तयार केला आणि तो घेतला. त्यामुळं तिचा गर्भपात झाला. ज्यावेळी पीडित मुलीच्या घरचे घरी आले तेव्हा घरी मुलगी बेशुद्ध पडली होती. बाजूला चार-पाच महिन्यांचे अर्भक होते. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले आणि याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्या आरोपी युवकाविरोधात पोक्सा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here