पुणे हादरलं! प्रियकरासोबत आलेल्या 17 वर्षीय मुलीवर RPF जवानाकडून लैंगिक अत्याचार

Crime news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरात प्रियकरासोबत पळून आलेल्या एका 17 वर्षीय मुलीवर आरपीएफ जवानाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित मुलगी छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. ती आपल्या प्रियकरासोबत घर सोडून पुण्याला निघून आली होती. परंतु याचकाळात अनिल पवार आणि कमलेश तिवारी अशा दोन आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी आता लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी छत्तीसगड राज्यातील रहिवासी असून ती इयत्ता दहावी शिकत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती आपल्या प्रियकरासोबत पुण्यात आली होती. ठीक 12 सप्टेंबर रोजी हे दोघेजण पुणे रेल्वे स्थानकावर पोचले होते. परंतु याचवेळी या दोघांकडे तीन व्यक्ती आले. या व्यक्तींनी पीडित मुलीला आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात नेले. यानंतर पोलीस कर्मचारी अनिल पवार यांनी या दोघांना रेल्वे कॉलनीतील एका खोलीत नेले. तसेच या दोघांकडे पैशांची मागणी केली. परंतु पैसे नसल्यामुळे अनिल पवार याने पीडित मुलीवर बलात्कार केला तसेच कमलेश तिवारी याने देखील संधी साधून मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

यादरम्यान त्यांनी पीडित मुलीच्या प्रियकराला सोडून दिले. मात्र पीडित मुलीला आपल्याजवळ ठेवून त्यांनी तिच्यावर सलग पाच ते सहा दिवस लैंगिक अत्याचार केले. मुख्य म्हणजे, पीडित मुलीचे वडील आपल्या मुलीला शोधण्यासाठी छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले होते. पोलिसांच्या तपासामुळे कुटुंबाला पीडित मुलगी सापडली. यानंतर तिने आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. सध्या पुणे शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षितचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.