हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रम शाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. समता आश्रम शाळेत ही घटना घडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर प्रशासनही जागे झालं असून २४ तासांत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, जेवणातील बासुंदीतून या सर्व विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये पाच ते पंधरा वर्षांपासून मुलांचा आणि मुलींचा समावेश आहे. सुरुवातीला या विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ सुरु झाली. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना हा त्रास सुरु झाल्याने आश्रम शाळेतील कर्मचारी सुद्धा एकदम घाबरुन गेले होते. 79 विद्यार्थी सध्या उपचार घेत आहेत असून त्यांची प्रकृती ठीक आहे. उर्वरित 90 विद्यार्थ्यांना उपचारासाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जत मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दरम्यान, या गंभीर घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 24 तासात विषबाधेचा अहवाल देण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाला दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये, अशाही सूचना त्यांनी मेडिकल कॉलेजची यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. उमदीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. जवळपास 200 च्या आसपास मुले-मुली या आश्रमशाळेत आहेत . यातील तब्बल १७० मुलांना विषबाधा झाल्याने आश्रम शाळेतील कर्मचारी सुद्धा एकदम घाबरुन गेले होते.