हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल
लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले होते, परंतु ऑनलाइन नोंदणीमध्ये काही अडचणी येत होत्या. तसेच अनेकदा व्हॅक्सिनचा स्लॉट बुक केल्यानंतरही अनेक लोक व्हॅक्सिन घेण्यासाठी सेंटरवर येत नाही. त्यामुळे लस वाया जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत 19 कोटींहून अधिक डोसआतापर्यंत देशात लोकांना कोरोना लसीचे 19.60 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सध्या बर्याच राज्यात लसीची कमतरता आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस दिली जात नाही.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.