मुंबई प्रतिनिधी | २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपात भाजपकडून तब्बल १८ विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यातील अनेकजण हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ पक्षामध्ये सक्रिय राहिले आहेत. निष्ठवंतांना डावलून आयारामांना किंवा डावलण्यात आलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तिकिट देण्यात आले आहे. नाराज विद्यमान आमदारांपैकी काही जणांनी बंडखोरी केली असून काहींनी पक्षनिष्ठ राहण्यावरच भर दिला आहे. या संपूर्ण तिकिट वाटपावर मुख्यमंत्र्यांचाच वरचष्मा राहिल्याचं चित्र आता समोर येत आहे. पक्षांतर्गत विरोधक कमी करत असताना फडणवीसांना या १८ विद्यमान आमदारांना नारळ देण्यात यश आले आहे.
कोण आहेत तिकीट न मिळालेले विद्यमान आमदार
एकनाथ खडसे
विनोद तावडे
प्रकाश मेहता
मेधा कुलकर्णी
राज पुरोहित
सरदार तारासिंह
विजय काळे
बाळा काशिवार
उदेसिंह पाडवी
उन्मेष पाटील
प्रभूदास भिलावेकर
चरण वाघमारे
बाळासाहेब सानप
सुधाकर कोठले
आर. टी. देशमुख
संगिता ठोंबरे
सुधाकर भालेराव
राजू तोडसाम