18 फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द, DCGI चा दणका; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने देशातील 18 फार्मा कंपन्यांचे (Pharma Company) लायसन्स रद्द केलं आहे. या कंपन्यांनी नकली औषधे बनवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातील बहुतांश कंपन्या या उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत. केंद्र सरकारकडून यापूर्वी सुद्धा बनावट औषधांच्या निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती.

बनावट औषधे बनविणाऱ्या कंपन्यांवर सरकार कठोर कारवाई करत आहे. DCGI ने 20 राज्यांतील 76 कंपन्यांची तपासणी केली होती. आत्तापर्यंत या कारवी अंतर्गत हिमाचल प्रदेशातील 70, उत्तराखंडमधील 45 आणि मध्य प्रदेशातील 23 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी डेहराडून येथील हिमालया मेडीटेक प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना 30 डिसेंबर 2022 पासून रद्द करण्यात आला तसेच याच वर्षी 7 फेब्रुवारी रोजी 12 उत्पादने तयार करण्याची परवानगी सुद्धा रद्द करण्यात आली.

हिमाचल प्रदेशातील बड्डी येथील श्री साई बालाजी फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेडला कारणे दाखवा आणि उत्पादन थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे. याशिवाय Gnosis Pharmaceuticals Pvt Ltd, Nahan Road, Village Moginand, Kala Amb, Sirmaur (हिमाचल) यांना कॉस्मेटिक उत्पादनासाठी कारणे दाखवा आणि उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.