Saturday, January 28, 2023

LIC च्या या पॉलिसीमध्ये 150 रुपये गुंतवून मिळतील 19 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । आजच्या काळात पालक त्यांच्या मुलांसाठीच्या आर्थिक नियोजनातही गुंतलेले असतात. हे लक्षात घेता, देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन (LIC) ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन अनेक पॉलिसी देते. या कंपनीच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूकीवर ग्राहकांना बरेच फायदे देखील दिले जातात. अनेकजण मुलांचे शिक्षण, लग्न आणि इतर खर्चासाठी कुठेतरी गुंतवणूक करतातच. भारतीय जीवन विमा महामंडळातही अशाच काही योजना आहे ज्या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केल्या गेल्या आहेत. आम्ही LIC च्या ‘LIC New Children’s Money Back Plan’ बद्दल बोलत आहोत.

चला तर मग ‘या’ पॉलिसी बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात …

- Advertisement -

>> हा विमा घेण्याचे किमान वय 0 वर्षे आहे.

>> विमा घेण्याचे कमाल वय 12 वर्षे आहे.

>> त्याची किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे.

>> विम्याच्या रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही.

>> प्रीमियम माफी बेनिफिट रायडर-ऑप्शन देखील उपलब्ध.

मॅच्युरिटी पीरियड- LIC च्या नवीन मुलांच्या मनी बॅक योजनेची एकूण मुदत 25 वर्षे आहे.

मनी बॅक हप्ता- या योजनेनुसार LIC मुलाच्या वयाच्या 18 वर्षे, 20 वर्षे आणि 22 वर्षांच्या मूलभूत रकमेपैकी 20-20 टक्के रक्कम देते.

उर्वरित 40 टक्के रक्कम पॉलिसीधारकाची 25 वर्षे पूर्ण झाल्यावर दिली जाईल. यासह, सर्व थकित बोनस दिले जातील.

मॅच्युरिटी बेनिफिट – पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळी (पॉलिसीच्या मुदतीत विमाधारकाचा मृत्यू झाला नाही तर) पॉलिसीधारकास उर्वरित रकमेपैकी उर्वरित 40% रक्कम बोनससह मिळेल.

डेथ बेनिफिट – पॉलिसीधारकाच्या पॉलिसीच्या मुदतीमध्ये मृत्यू झाल्यास, सम अ‍ॅश्युअर्ड अधिक निहित साधा रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस दिला जातो. डेथ बेनिफिट एकूण भरलेल्या प्रीमियमच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group